
कणकवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचे वडील भास्कर दिगंबर पारकर (८३) यांचे बुधवारी सकाळी ६ वा.च्या सुमारास निधन झाले. भास्कर पारकर हे आजारी असल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
शिवसेना उबाठाचे तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, समीर पारकर यांचे ते वडील होत. बुधवारी दुपारी १२. ३० वाजता येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, महिना भरापूर्वीच संदेश पारकर यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते.