
चिपळूण : मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या ५८ वा सांस्कृतिक युवा महोत्सव २०२५-२६ ची उत्तर रत्नागिरी झोनची प्राथमिक फेरी ज्ञानदीप महाविद्यालय मोरंवडे - बोरज येथे दि.२४ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झाली. या झोनमध्ये एकूण २२ महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेचे डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालय मांडकी - पालवण यांनी स्कीट ग्रुप (A) व वकृत्व स्पर्धा ग्रुप (B) या कलाप्रकार मध्ये तृतीय क्रमांक पटकाविला यामधील विद्यार्थ्यांची निवड मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी झाली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अंजलीताई चोरगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सोनल सुर्वे व प्रा. धनश्री सुर्वे, कोरिओग्राफर संकेत हळदे, आसदाद मोरे , प्रा. संदिप येलये, प्रा. नंदा कांबळे ,प्रा. सानिया मुल्लाजी,प्रा. अशोक लाड, प्रा. श्वेता सकपाळ व श्री. राजेंद्र सुर्वे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाची व सांस्कृतिक विभागाच्या कार्याची दखल घेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे सर, उपाध्यक्ष डॉ निखिल चोरगे, सचिव श्री. मिलिंद सुर्वे, अधीक्षक श्री.प्रफुल्ल सुर्वे, गोविंदराव कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम,जिजामाता कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे व सर्व संचालक,पदाधिकारी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अंजलीताई चोरगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.










