कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार निलेश राणे

शहरातील गणेश घाट शुशोभिकरण कामाचा झाला शुभारंभ
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 29, 2025 19:40 PM
views 48  views

कुडाळ : कुडाळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपये आले आहेत या योजनेच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही शहराच्या सौंदर्यात आणि विकासात भर घालणारी आहेत लवकरच शहरातील अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंतचा रस्ता कॉंक्रिटीकरण करण्याचा आमचा मानस आहे असे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ शहरातील गणेश घाट शुशोभीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी सांगून नगराध्यक्षांसह आमचे सर्व नगरसेवक चांगली कामे करत आहेत असे कौतुकही त्यांनी यावेळी केले.

कुडाळ नगरपंचायतीच्या मुख्य गणेश घाट सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सचिव दादा साईल, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, शहर प्रमुख अभिषेक गावडे, महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, नगरसेविक राजीव कुडाळकर, उदय मांजरेकर, स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे, नगरसेविका चांदणी कांबळी, अक्षता खटावकर, आफरीन करोल, ज्योती जळवी, श्रेया गवंडे, मुख्याधिकारी विनायक औंधकर तसेच आधी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की आपल्याला मिळालेली पाच वर्ष ही विकासासाठी आहेत आपल्याला वर लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिले आहे त्यामुळे आपल्या भागाचा विकास करण्याची प्राथमिक जबाबदारी आपली आहे त्यामुळे कुडाळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी मी कटिबद्ध आहे त्यामुळेच विविध विकास कामांना जो निधी येत आहे तो शहराच्या विकासाला भर देऊन सौंदर्यात वाढ करणारा आहे आमचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ नगर विकास खाते आहे त्यामुळे विकास निधीला कुठेही कमतरता होणार नाही नगरसेवकांनी आपल्या मधील मतभेद किंवा श्रेयवाद करण्यापेक्षा जो नेता येईल त्या नेत्याजवळ आपल्या कामाची यादी घेऊन जाऊन शहराच्या विकासाची जबाबदारी खांद्यावर घेतली पाहिजे शहरांमध्ये भविष्यात मच्छी मार्केट नगरपंचायतीची इमारत नळ पाणी योजना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प असे अनेक विकासाच्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने त्याला हातभार लावला पाहिजे असे सांगून अभिमन्यू हॉटेल ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जो रस्ता येतो तेथे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे त्यामुळे अधिक शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे हे शहर मध्यभागी असल्यामुळे विकसित करण्याच्या संधी अनेक आहेत असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना कर निरीक्षक राजू पठाण यांनी केले तर सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले.

एमआयडीसी मध्ये उभारणार अत्याधुनिक मैदान 

कुडाळ एमआयडीसी क्षेत्रामध्ये भव्य स्टेडियम आणि त्याच्या आजूबाजूला इनडोअर स्टेडियम उभारले जाणार आहेत यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून त्यासाठी लागणारे निधी त्यांनी उपलब्ध करून देण्याचे कबूल केले आहे अशा अनेक विकासात्मक गोष्टी कुडाळ शहरात होणार आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.