फळ विमा योजनेसाठी जिल्हा बँकेच्या शाखा एक तास जास्त सुरु राहणार

अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती
Edited by: संदीप देसाई
Published on: November 30, 2023 13:51 PM
views 147  views

सिंधुदुर्ग : हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना २०२३ चे अनुषंगाने आंबा व काजू पीक विमा हप्ता भरण्याची असलेली अंतिम तारीख दिनांक ३०/११/२०२३ म्हणजे आज रोजी संपत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरण्यासाठी ज्यादा वेळ मिळावा या हेतूने जिल्हा बँकेच्या सर्व शाखा आज गुरवारी ३०नोव्हेबर ला एक तास जादा वेळ सुरू राहतील, अशी माहीती बँकेचे अध्यक्ष  मनिष दळवी यांनी दिली आहे.                                 

चालू वर्षीचा आंबा पीक विमा प्रति हेक्टर रू.७,०००/-  (प्रति गुंठा रुपये ७०/-) व काजू पिक विमा प्रति हेक्टरी रुपये ५,०००/-(प्रति गुंठा रुपये ५०/-)याप्रमाणे द्यावयाचा असून विमा उतरणाऱ्या शेतकऱ्याने अर्जासोबत सादर केलेल्या सातबारा उताऱ्यावरील पिकाच्या क्षेत्रानुसार वरील प्रमाणे हेक्टरी प्रमाणानुसार होणारी रक्कम आजच अर्जदाराच्या बचत खाती नावे लिहून तालुका शाखेच्या पार्किंग खाती जमा करण्यात यावी याबाबत बँकेच्या विकास अधिकारी यांना कळविण्यात आले आहे .चालू वर्षे पिक विमा पोर्टलमधील तांत्रिक बिघाडामुळे सभासदांची माहिती सद्यस्थितीत पोर्टलवर अपलोड करता येत नाही मात्र पोर्टल नियमित होताच सभासदांची माहिती अपलोडिंग व विमा हप्ता पाठवण्याची कार्यवाही विकास अधिकारी व प्रधान कार्यालय कर्ज विभाग यांच्या मदतीने पूर्ण करण्यात येणार आहे. याबाबत काही अडचणी असल्यास तालुका विकास अधिकारी व कर्ज विभाग अधिकारी आनंद टेमकर मोबाईल नंबर ९४०३३६६२७० व श्याम कनयाळकर मोबाईल नंबर 94 21 26 82 यांच्याशी संपर्क साधावा. हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना२०२३ चे अनुषंगाने आंबा व काजू पिक विमा भरण्याची असलेली अंतिम तारीख दिनांक आज रोजी ३०/११/२०२३ रोजी संपत आहे त्यामुळे बँकेच्या शाखेकडील कर्जदार व प्राप्त झालेल्या बिगर कर्जदार विमा अर्जानुसार विमा हप्ता कोठे होणारी रक्कम त्यांच्या बचत खाते आजच नावे पडणे आवश्यक आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांना विमा हप्ता रक्कम भरण्यासाठी ज्यादा वेळ मिळावा या हेतूने सिंधुदुर्ग बँक बँकेच्या सर्व शाखा आज रोजी एक तास ज्यादा वेळ सुरू राहतील अशी माहीती बँकेचे अध्यक्ष श्री मनीष दळवी यांनी दिली आहे.