केशवसुत कट्ट्यास नवसंजीवनी

Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2022 20:03 PM
views 244  views

सावंतवाडी : केशवसुत कट्ट्यावरील तुतारीच्या आजूबाजूच्या परिसराची म्हणजेच बैठक व्यवस्था, खालील नवीन स्टाईलस व कवितांच्या पाट्या नव्यानं बसवणे या कामाची आजपासून सुरुवात झाली आहे. नूतनीकरण कामाला सुरुवात करण्यात आली असून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंजूर केलेल्या निधीतून हे काम होत आहे.माजी नगराध्यक्ष बबन  साळगावकर यांच्या कार्यकाळात त्यांच्या संकल्पनेतून केशवसुत कट्टा इथं ही कविवर्य केशवसुतांच स्मारकरुपी तुतारी उभारली होती. 

परंतू, कालांतराने ती तुतारी जीर्ण झाल्यामुळे त्याच्या नूतनीकरणासाठी केशवसुत कट्ट्यावर बसणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व साहित्यिक, पत्रकारांनी हा मुद्दा उचलून धरला. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी यांची दखल घेत लोकवर्गणीतून तुतारी उभारण्याचा संकल्प केला. संजय पेडणेकर, रवी जाधव, दत्तप्रसाद गोठस्कर, प्रदीप ढोरे यांसह शहरातील नागरीकांच्या सहकार्यान ही तुतारी नव्यानं उभारली. आ. दीपक केसरकर व पल्लवी केसरकर यांच्या माध्यमातून देखील भरीव मदत यासाठी करण्यात आली. नवीन तुतारीचा लोकार्पण सोहळा देखील थाटात संपन्न झाला. यानंतर माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, केशवसुत कट्ट्यावरील ज्येष्ठ नागरिकांच्या मागणी नुसार या कट्ट्याचा नुतनीकरणास प्रारंभ झाला असून नवसंजीवनी या कट्ट्याला प्राप्त होणार आहे. या कामाचा शुभारंभ आजपासून करण्यात आला आहे. केशवसुत कट्ट्यावरील जेष्ठ नागरिक दत्तप्रसाद गोठोसकर, प्राध्यापक एम .व्ही. कुलकर्णी, प्रदीप ढोरे, मुकुंद वझे, प्रकाश मसुरकर ,शामसुंदर भाट प्रा. दीपक गडकर, प्रदीप पियोळकर , अरुण मेस्त्री, शंकर प्रभू यांनी या केशव कट्ट्याच्या नुतनीकरणासाठी विशेष प्रयत्न केले होते.