
देवगड : पंचायत समिती देवगड येथे स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी ध्वजारोहण केले.
याप्रसंगी राष्ट्रगीत व ध्वजगीत गायन करण्यात आले . त्यानंतर देशभक्तीपर गीते विषय तज्ञ नारायण चव्हाण , विशेष शिक्षक दत्तात्रय घाडी, श्रेया अनभवणे यांनी सादर केली. त्यानंतर तनिष्क पेडणेकर या बालकाने देशभक्तीपर संवाद साधत सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर देवगड तालुक्यातील स्वच्छतेमध्ये व पाणी गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केलेले कर्मचारी त्यामध्ये शिरगांव येथील भाग्यश्री जाधव, पडेल गावातील अनंत मासये, वाघोटन गावातील विष्णु घाडीगांवकर, तिर्लोट गावातील शैलेश गिरकर, मिठमुंबरी गावातील हेमंत तोडणकर, बांधकाम विभाग शरद चुनेकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी मार्गदर्शन केलं.
यावेळी कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक कुणाल मांजरेकर, अधिक्षक मेधा राणे, विस्तार अधिकारी ग्रा.प दीपक तेंडुलकर, बांधकाम उप अभियंता नरेंद्र महाले, शाखा अभियंता बांधकाम अनिल तांबे, पशुधन अधिकारी डॉ. माधव घोगरे, सहाय्यक लेखाधिकारी विवेक चिंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी मानले.