
सावंतवाडी : वीज ग्राहकांना डिपॉझिट सक्ती अतिरिक्त सुरक्षा ठेव देयकेचा सदराखाली भरण्याची सक्ती नको. तसेच वीज ग्राहकांची आपल्याकडे पुर्वीच डिपॉझिट कंपनीकडे भरलेली आहे. त्यामुळे पुन्हा डिपॉझिट रक्कम सक्तीने वसुल करण्यास विरोध असल्याचं मत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी व्यक्त केले आहे. विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांवर वीज बिलामधून आकारलेले सर्व कर रद्द करण्यात यावेत आणि ग्राहक वापरत असलेल्या विजेच्या निव्वळ बिल ग्राहकांना आकारावे, अन्यथा ग्राहकांसह वीज कार्यालया ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा महावितरण उप कार्यकारी अभियंतांना दिला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने चालु लाईट बिलासोबत डिपॉझिट रक्कम अतिरिक्त सुरक्षा ठेव देयकच्या सदराखाली भरण्याची सक्ती नको. विज ग्राहक तसेच नागरीक आधीच महागाईच्या फेऱ्यात अडकलेले असून कोरोनानंतर झालेल्या महागाईच्या संकटातून बाहेर पडलेले नाहीत. विद्युत कंपनीच्या या धोरणाला नागरीकांचा कडाडून विरोध आहे. प्रसंगी विज ग्राहक रस्त्यावर उतरतील. त्यामुळे डिपॉझिट रुपाने नागरीकांवर आकारण्यात आलेली रक्कमेची बिले कंपनीने त्वरीत मागे घ्यावी, तसेच विद्युत बिलामध्ये झालेली वाढ तात्काळ मागे घ्यावी. तर विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांवर वीज बिलामधून आकारलेले सर्व कर रद्द करण्यात यावेत आणि ग्राहक वापरत असलेल्या विजेच्या निव्वळ बिल ग्राहकांना आकारावे. अन्यथा ग्राहकासह वीज कार्यालया ठिकाणी आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा दिला आहे. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सत्यजित धारणकर, महेश नार्वेकर आदी उपस्थित होते.