...अन्यथा बांधकाम खात्याला घेराव

माजी सरपंच रामचंद्र सावंत आक्रमक
Edited by: संदीप देसाई
Published on: May 31, 2023 12:48 PM
views 88  views

दोडामार्ग : तळकट पडवे माजगाव रस्ता पावसापूर्वी खड्डे भरून दुरुस्ती होणे ही जबाबदारी जिल्हा परिषद बांधकाम खात्याने घ्यावी, अन्यथा येथे मंगळवारी जिल्हा परिषद उप अभियंता सावंतवाडी यांच्या कार्यालयात तळकट व परिसरातील ग्रामस्थांना घेऊन कार्यालयात अधिकाऱ्यांना घेराव  घालू असा इशारा तळकटचे माजी सरपंच रामचंद्र सावंत, विलास सावळे, विजय भिसे, संदीप कळमकर आदींनी दिला आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी उपस्थित होते.

 जिल्हा परीषद बांधकाम विभागचे शाखा अभियंता कल्याणकर व पंचायत समिती अधिकारी पाटकर यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले.  रस्ता मंजुरीचे कारण पुढे करून रस्ता  करण्याचे धोरण असताना या परिसरातील ग्रामस्थांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळून झालेली आहे. त्यामुळे तातडीने दुरुस्ती काम हाती घेण्याची मागणी सावंत व ग्रामस्थानी केली आहे.

दरम्यान यापूर्वी सरपंच सुरेंद्र सावंत व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थानी याकडे लक्ष वेधले होते. उपोषण आंदोलन ही छेडले होते. मात्र तरीही आश्वासन देऊन ग्रामस्थांची निराशा करण्याचे काम जिल्हा परीषद बांधकाम ने केले आहे.