
वैभववाडी : ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेच्या अनुशंगाने शहरातील बँनर नगरपंचायतीने आज (दि.१८ )हटविले आहेत. शहरात दुपारी ही मोहीम राबविण्यात आली. यामुळे शहराने आता मोकळा श्वास घेतला आहे.तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने शहरातील सर्व राजकीय पक्षासहीत इतर सर्व बँनर हटविले आहेत. विविध सणांसहीत कार्यक्रमांच्या शुभेच्छा देणारे बँनर शहरात लागले होते. चमकोगिरी करणाऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठ व्यापून टाकली होती.तसेच काही कंपनीच्या जाहिरातींचेही बँनर जागोजागी लागले होते. आज हे सर्व बँनर नगरपंचायतीने काढून टाकले. त्यामुळे शहराने देखील मोकळा श्वास घेतला. शहरात लावलेल्या या बँनरमुळे काही ठिकाणी वाहतुकीला अडथळाही निर्माण होत होता. अखेर निवडणुकीच्या निमित्ताने का होईना नगरपंचातीने ही कारवाई केली आहे.त्याच स्वागत शहरवासीयांकडून होत आहे.