भरणीत मिळणार BSNL चं 5 जी नेटवर्क !

टॉवरचे भूमिपूजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: November 21, 2023 13:16 PM
views 367  views

कणकवली : भरणीत बीएसएनएल 5 जी टॉवरचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे कित्येक वर्षांचं भरणीवासियांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. कणकवली तालुक्यातील भरणी गावात  अनेक वर्षे  कोणतेही मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे  ग्रामस्थांनी या टॉवरसाठी पाठपुरावा केल्यामुळे आता BSNLची रेंज मिळणार असून  मोबाईलची रिंग वाजणार आहे.

कोणतंही शासकीय काम असेल, आरोग्याच्या सेवेसाठी आणि इतर सर्वप्रकारे संपर्क करण्यासाठी भरणी गावातील ग्रामस्थांना मोबाईल नेटवर्कसाठी 3 किमी अंतरावर जाऊन संपर्क करावा लागत होता. गावातील दानशूर नागरिक अण्णा परब यांनी या टॉवरसाठी स्वत:ची जमीन मोफत स्वरुपात दिली आहे. आज या टॉवरचे भुमिपूजनावेळी भरणी सरपंच अनिल बागवे, उपसरपंच प्रशांत घाडी, पोलीस पाटील  लक्ष्मीकांत ताम्हणकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष  मनिष पाताडे, भारतीय मजदूर संघ सिंधुदूर्ग उपाध्यक्ष अशोक घाडी, ग्रामपंचायत सदस्य  प्रवीण जगताप, अक्षय गुरव, राधिका पाटकर, मनिषा तांबे, लक्ष्मी जगताप, वैदही पुजारे,तसेच पुरोहित  आनंद साळसकर,ग्रामस्थ अण्णा परब,शामसुंदर जगताप,रामचंद्र राणे,प्रकाश मेस्त्री, गजानन जगताप, नितेश जगताप, दादा मेस्त्री, सुरेश साटम, लवू गुरव, बबन चिंचवलकर, निलेश शेट्ये, वैभव शेट्ये, लक्ष्मी चिंचवलकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

नवीन बीएसएनएल टॉवर होत असल्यामुळे भरणी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार असून सर्व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. विशेषत: या टॉवरसाठी गेली अनेक वर्षे लक्ष्मीकांत ताम्हणकर,अनिल बागवे, प्रशांत घाडी, प्रवीण जगताप, अशोक घाडी, मनिष पाताडे यांनी शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला असून ग्रामस्थांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहे.