
सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत सुयश मिळवले आहे. टेबल टेनिसमध्ये शाळेच्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. यात मंथन सावंतभोसले, अब्दुर रेहमान, भव्य पटेल, अभिराज कुडतडकर आणि शरीक बांदेकर यांचा समावेश होता. मंथन सावंतभोसले याने उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्पर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळवला.
स्केटिंगमध्ये अकरा वर्षाखालील मुलांच्या कॉड प्रकारात पाचवीतील याश्मीत ठाकूर याने प्रथम, चौथीतील शिवास पेडणेकर व शिवन पेडणेकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला. अकरा वर्षाखालील मुलींच्या गटात पाचवीतील स्पृहा शिरतुडे हिने प्रथम क्रमांक मिळवला. चौदा वर्षाखालील मुलींच्या गटात इनलाईन प्रकारात सहावीतील शुभ्रा देसाई, आणि मुलांच्या गटात सहावीतील चिराग राऊळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला. सीबीएसई क्लस्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत एकोणीस वर्षाखालील गटात दहावीतील सर्वेश नवार याने भालाफेकमध्ये उत्तम कामगिरी करत पाचवा क्रमांक मिळवला.सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर व एस्तर परेरा यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले, शाळेच्या, मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.