
सावंतवाडी : शहरातील शुभेच्छांचे बॅनर रस्त्यावर आडवे झाले असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठाने याकडे प्रशासनाचे लक्ष वेधलं आहे.
शहरात नेमून दिलेल्या जागेखेरीज सर्वत्र बॅनर लावले जातात. हे बॅनर तुटून रस्त्यावर पडत आहेत. यामुळे अपघात होऊन गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या समस्येवर सावंतवाडी नगरपरिषद लक्ष देणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केला आहे