
सावंतवाडी : सावंतवाडी इनरव्हिल क्लबची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या क्लबच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष शितल केसरकर, सचिवपदी वैभवी शेवडे तर खनिजदारपदी पुजा पोकळे यांची निवड करण्यात आली आहे. नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सभारंभ २२ जुलैला कोल्हापूर इनरव्हीलच्या माजी अध्यक्षा मनीषा जाधव यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
2024-25 इनरव्हील क्लबची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ सुमेधा धुरी, उपाध्यक्ष शितल केसरकर, सेक्रेटरी वैभवी शेवडे, खजिनदार पूजा पोकळे, आयएसओ देवता हावळ,एडिटर दर्शना बाबर देसाई यांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी हर्टबीट ऑफ ह्युमिनीटी पर्यावरण पूरक उपक्रम, गरीब होतकरू स्त्रीला शिलाई मशीन देऊन रोजगार उपलब्ध करण्यासाठी सहाय्य करणे, हॅप्पी स्कुल, वैद्यकीय शिबिर, स्त्री आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन जागरूकता, दिवाळी भेट, पाडवा दीपोत्सव असे सामाजिक तसेच सांस्कृतिक उपक्रम राबविणार असल्याची माहीती इनरव्हील क्लबच्या नवनिर्वाचित अध्यक्षा डॉ सुमेधा धुरी यांनी दिली आहे.