मालवणातील निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची चौकशी व्हावी

ठाकरे गटाची मुख्याधिकारी - सा.. बां.च्या अधिकाऱ्यांकडे मागणी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 20, 2023 21:00 PM
views 201  views

मालवण : शहरात सध्या सुरू असलेल्या विकासकामे ही निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे या विकासकामांची चौकशी करण्यात यावी. जोपर्यत या कामांची चौकशी होत नाही तोपर्यंत संबधित ठेकदाराला बील अदा करण्यात येवू नये अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे मुख्याधिकारी संतोष जिरगे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. 


दरम्यान शहरातील विकासकामे व आरोग्याच्या प्रश्नाबाबत उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, बाबी जोगी, शिला गिरकर, दिपा शिंदे, रश्मी परूळेकर, भाई कासवकर, सन्मेष परब, मंदार ओरसकर, नरेश हुले, तपस्वी मयेकर, हेमंत मोंडकर, करण खडपे, बंड्या सरमळकर, सिद्धेश मांजरेकर आदि उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,  शहरातील परूळेकर गल्लीचे कॉक्रेटीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. मेढा दोन पिंपळ गटार व वायरी रस्त्याचे सुरू असलेले कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पालिकेच्या भाजी मंडईच्या इमारतीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. मामा वरेरकर सभागृहाकडील नाट्यगृहाकडील हॉलचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. शहरातील सक्शन गाडी गेले महिनाभर बंद आहे. पर्यटन हंगामात सक्शन गाडी बंद असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. शहरातील सार्वजनिक शौचालयांचे दरवाजा बसविण्याबाबत तीन महिने पाठपुरावा करूनही ते बसविण्यात आले नाहीत. शहरातील ठेकेदाराने कचऱ्याचे काम सुरू केले तरी शहरात कचऱ्याची समस्या जैसे थे आहे. शहरातील कित्येक रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झाडी तोडण्यात आलेली नाही. शहरातील मच्छरचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यावरही उपाययोजना करणे आवश्यक आहे.