परशुराम उपरकरांच्‍या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: April 13, 2026 20:01 PM
views 38  views

कणकवली : उबाठा शिवसेनेचे लढवय्‍या नेते तथा माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांचा वाढदिवस उद्या, मंगळवार, १४ एप्रिला साजरा होत आहे. त्‍यानिमित्त उबाठा शिवसेना कणकवली, परशुराम उपरकर मित्रमंडळ, तेली आळी मित्रमंडळ व मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग यांच्‍यातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजशन करण्‍यात आले आहे.

मोफत आरोग्‍य शिबिर

परशुराम उपरकर यांच्‍या वाढदिवसानिमित्त मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ सिंधुदुर्ग, उबाठा शिवसेना आयोजित व बी. के. एल. वालावलकर रुग्‍णालय डेरवण यांच्‍या संयुक्‍त विद्‍यमाने मोफत आरोग्‍य शिबिराचे आयोजन येथील भगवती हॉल येथे वाढदिनी, १४ एप्रिलला करण्‍यात आले आहे. शिबिरात अँजिओप्‍लास्‍टी, कर्करोग, पित्ताशयातील खडे, कान नाक, घसा, बायपास, मुतखडा, प्रोस्‍टेड ग्रंथी, मोतीबिंदू या शस्‍त्रक्रीया मोफत केल्‍या जाणार आहेत. तर हर्निया, महिलांचे गर्भाशयाचे आजार, थायरॉईड, मडक्‍यांची दुर्बिणीद्‍वारे शस्‍त्रक्रीया, अपेंडीक्‍स, मुळव्‍याध, स्‍नतांमधील गाठी, हायड्रोसेल, इम्‍प्‍लांट रिमूव्‍हल या शस्‍त्रक्रीया अल्‍प दरात केल्‍या जाणार आहेत. त्‍यासाठी जनरल सर्जन, स्‍त्रीरोगतज्ज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोगतज्ज्ञ, अस्‍थिरोतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ आदी स्‍पेशालिस्‍ट डॉक्‍टर उपस्‍थित असणार आहेत. हे शिबिर सकाळी १०.३० ते दुपारी २  या कालावधीत असणार आहे. शिबिराचे उद्‍घाटन माजी आमदार वैभव नाईक व नगराध्‍यक्ष संदेश पारकर यांच्‍या उपस्‍थितीत होणार आहे.

सायंकाळी शुभेच्‍छा स्‍विकाणार

श्री. उपरकर हे सायंकाळी ७.३० वा. भगवती हॉल येथे वाढदिवसाच्‍या शुभेच्‍छा स्विकारणार आहेत. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्‍यक्ष संदेश पारकर यांच्‍यासह उबाठा शिवसेनेचे जिल्‍हाभरातीलर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्‍थित राहणार आहेत. उपरकरप्रेमींनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थित रहावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.