मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबीर

Edited by: विनायाक गांवस
Published on: April 24, 2026 17:26 PM
views 19  views

सावंतवाडी : सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघाकडून शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान,सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग आणि राष्ट्रवीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. हे शिबिर गुरुवार दि २१ मे ते २८ मे २०२६ रोजी सकाळी ७:०० ते १०:०० वा. यां कालावधीत सावंतवाडी येथे आयोजित करण्यात येणार आहे. या सुवर्णसंधीचा लाभ पहिल्‍या दिवसापासून शेवटच्‍या दिवसापर्यंत सर्वांनी घ्यावा असे आवाहन केले आहे. या शिबीरात सहभागी होऊ इच्‍छिणार्‍याचे किमान वय ८ वर्षे पूर्ण असणे आवश्‍यक आहे. शाळा व महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या सावंतवाडी परिसरातील (सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित) मुला व मुलींना प्राधान्याने सहभागी करून घेतले जाईल. सदर प्रशिक्षण शिबीराचा तपशिलवार कार्यक्रम लवकरच घो‍षित करण्‍यात येईल. प्रशिक्षणाचे शुल्क १५०/- रु घेतले जातील. ( सदर शुल्कात प्रत्येकाला काठी देण्यात येईल ) कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे प्रशिक्षक आशिष खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.या शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील व्यक्तींना संपर्क करा किंवा त्यांना व्हाट्सअप मॅसेज करून आपले नाव, गाव, वय, संपर्क क्र. इत्यादी माहिती १० मे पर्यंत कळवून नावनोंदणी करा .अधिक माहितीसाठी संपर्क 

एकनाथ गुरव - 9011486881

संपदा राणे -  9158578259

प्रमोद मगर - 8698387138 असे आवाहन करण्यात आले आहे