'भाजपा चषक २०२६' डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला विशाल परब यांनी दिली भेट

Edited by: विनायाक गांवस
Published on: March 31, 2026 13:16 PM
views 61  views

सावंतवाडी : भाजपा पुरस्कृत आणि रॉयल किंग आयोजित भव्य 'भाजपा चषक २०२६' डे-नाईट क्रिकेट स्पर्धेला भाजप युवा नेते विशाल परब यांनी भेट दिली. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून आलेल्या खेळाडूंमध्ये या निमित्ताने उत्साह पाहायला मिळाला. विशाल परब यांच्या उपस्थितीने क्रीडाप्रेमींचा उत्साह आणखीन द्विगुणित झाला. यावेळी भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक, मांद्रे सरपंच सावंत, टीम ओनर मकरंद तोरसकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.