सावंतवाडी पं. स. सभापती उपसभापतीपदी कोणाची वर्णी ?

9 मार्चला होणार फैसला
Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2026 15:32 PM
views 32  views

सावंतवाडी : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठीची निवडणूक प्रक्रिया अखेर जाहीर झाली असून येत्या ९ मार्च २०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. सभापती पद आरक्षित असल्याने उप सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

९ मार्च रोजी सकाळी पंचायत समितीच्या सभागृहात ही विशेष सभा पार पडणार आहे. या सभेमध्ये पीठासीन अधिकार्‍यांच्या उपस्थितीत दोन्ही पदांसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सभापती पदासाठी आरक्षण पडल्यानं शिवसेनेचा सभापती बसणार आहे. मात्र, उप सभापती पदी कुणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे‌. भाजप अन् शिवसेनेची ताकद अधिक असून अपक्षांचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे.