संजू परब यांचं महामानवास अभिवादन

Edited by: विनायक गांवस
Published on: April 15, 2026 14:19 PM
views 18  views

सावंतवाडी : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त संजू परब यांनी विनम्र अभिवादन केले. सावंतवाडी येथील समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले.


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमामुळे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला. संविधानासारखा एक जगण्याची आदर्श दिशा निर्माण करणारा महान ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला. २१व्या शतकातील सर्वोच्च बुद्धिमान व्यक्तिमत्त्वात बाबासाहेबांचा समावेश होतो, ही एक भारतीय म्हणून आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष व नगरसेवक सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी सावंतवाडी येथे केले. यावेळी त्यांच्या सोबत उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, शिवसेनेचे जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सामाजिक कार्यकर्ते गुंडू जाधव यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.