निराधार महिलेला सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळेचा आधार

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2026 15:14 PM
views 18  views

सावंतवाडी : ओटवणे येथील निराधार महिलेला सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळेने आधार दिला. प्रमिला राऊळ वय 60 असं त्या महिलेच नाव आहे‌. 

माजगाव नाला येथे रस्त्यावर ही वृद्ध महिला बसली होती. तेव्हा सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे यांनी तीला पाहिलं व तीची विचारपूस केली‌. आपली तब्येत बरी नाही. मला डॉक्टरकडे घेऊन चला असं ती महिला म्हणाली. यावेळी रूपा मुद्राळे यांनी तीला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. आपण ओटवणे येथे राहते असं तीन सांगितले.