देवगड मधील प्रभाग क्र. ७ मधील रहिवाश्यांचे मनसेतर्फे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: May 01, 2026 16:51 PM
views 72  views

देवगड : देवगड मधील प्रभाग क्र.७ मधील रहिवाश्यांकडून विविध समस्यांबाबत प्राप्त अर्जानुसार मनसेने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात असे म्हटले आहे की प्रभाग क्र. ७ मध्ये कावलेवाडी रोड पासून स्वामी समर्थ हॉल येथील रहिवाश्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार येथील वस्ती ही बरीच वर्ष रस्त्याच्या दिवा बत्ती वाचून राहत आहे.तेथील रहिवाश्यांना तेथे चालत फिरणे खूप कठीण झाले आहे. सरपटणारी जनावरे आणि कुत्रे यामुळे खूप मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्याच्या लाईटची मागणी स्थानिक रहिवाश्यांनी कित्येक वेळा केलेली असूनही त्यांना त्याची पूर्तता झालेली नाही.कर पट्टी वसूल करत असताना मात्र या सर्वांचा कर नागरिकांकडून वसूल करण्यात येतो.तर मग त्यांच्या मागणीनुसार त्यांना सुख सोयी का पुरवल्या जात नाहीत?

तरीही आपण यावर व्यक्तीशः लक्ष घालून तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा,अश्या आशयाच निवेदन मनसे कडून यावेळी देवगड मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे.यावेळी तालुका अध्यक्ष संतोष मयेकर,मनविसे तालुका अध्यक्ष पप्पू जाधव,महिला शहर अध्यक्षा  ममता धुरत, मनविसे शहर अध्यक्ष अभिजित तेली  व धिरज वाडेकर तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.