महाराष्ट्र दिन कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये उत्साहात साजरा

Edited by: लवू परब
Published on: May 01, 2026 16:35 PM
views 13  views

दोडामार्ग : महाराष्ट्र राज्याचा 67 वा स्थापना दिन नगरपंचायत कसई दोडामार्ग मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चेतन चव्हाण नगराध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर नगरपंचातकडून शिक्षक आनंदा बामणीकर यांना महाराष्ट्र शासनाचा 2023-24 चा क्रांतिज्योती सावित्री बाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आणि सन 2025 चा महाराष्ट्र शासन आयडॉल टीचर हे पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

    तसेच नगरपंचायत कसई दोडामार्ग च्या सन 2026-27 मधील मालमत्ता आणि पाणीपट्टी हे दोन्ही कर सर्वप्रथम भरणा केल्याने  निवेदिता श्रीकांत पारकर यांचा सत्कार करण्यात आला. हा नवीन उपक्रम नगरपंचातकडून पहिल्यांदाच राबविण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि महाराष्ट्र राजभाषा दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मुख्याधिकारी संकेत गायकवाड, अभियंता अभिषेक नेमाणे, लेखापाल आनंद परब, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मीकांत पिळणकर, शिक्षक आनंदा बामणीकर सर, निवेदिता नारकर, श्रीकांत नारकर, नगरपंचायत लिपिक वर्षा गवस, संजय शिरोडकर, सुरेखा ताटे, नगरपंचायत कर्मचारी आदी उपस्थित होते.