सिंधुदुर्गनगरीत नव्या रूपात साकारले आकर्षक सर्कल

रोटरी क्लबच्या पुढाकारातून शहर सौंदर्यात भर
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: May 02, 2026 09:28 AM
views 11  views

सिंधुदुर्गनगरी :  पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या हस्ते रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांच्या पुढाकारातून सुशोभित करण्यात आलेल्या सर्कलचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रातील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील चौक (सर्कल) काही काळापासून नादुरुस्त अवस्थेत होता. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल यांनी पुढाकार घेत, संबंधित प्राधिकरणाची लेखी परवानगी मिळवून सर्कलचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार क्लबच्या सदस्यांनी स्वखर्चाने आणि स्वयंप्रेरणेने सर्कलचे आकर्षक रूपांतरण केले.

या कार्यात रोटरी क्लब ऑफ कुडाळ तसेच रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलच्या काही सदस्यांनीही मोलाचे योगदान दिले.

उद्घाटन प्रसंगी प्रभाकर सावंत, डॉ. प्रशांत कोलते, अरूण मालणकर, दीपक आळवे, प्रथमेश सावंत, ललित वंजारे, ऋषिकेश रेडकर, उदयकुमार जांभवडेकर, नवीन बांदेकर, सत्यवान चव्हाण, सागर कुशे, अमेय बर्डे, डॉ. श्रद्धा मालवणकर, अभिजित जैतापकर, विवेक राणे, व्यंकटेश घोगळे आणि सिद्धांत सावंत आदी रोटरी क्लब सिंधुदुर्ग सेंट्रलचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.