
सावंतवाडी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे लक्ष्मण कदम, रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याचा सत्कार सभापती सुस्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीची निमित्ताने सावंतवाडी समाज मंदिर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी समाजामध्ये जागृत राहून सामाजिक कार्य करणारे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम, रवी जाधव यांच्या सामाजिक कार्याचा गौरव पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.










