वाढदिनी कणकवलीत वैभव नाईकांवर शुभेच्छांचा वर्षाव

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 26, 2026 18:52 PM
views 11  views

कुडाळ : मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय तसेच मित्र परिवार यांनी निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.पत्नी स्नेहा नाईक यांनी वैभव नाईक यांचे औक्षण करत त्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. कणकवली महिला आघाडीच्या वतीने देखील त्यांचे औक्षण करण्यात आले. कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते वैभव नाईक यांना हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. वाढदिवसानिमित्त वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, आई सुषमा नाईक, भाऊ सतीश नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, नंदिनी नाईक, राजवर्धन नाईक, नगरसेवक जयेश धुमाळे, धिरज पाटील, परेश पाटील, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख निलम पालव, सचिन कदम, जयभारत पालव, बाळा कोरगावकर, बाबा सावंत, राजू घाडी, रुपेश तायशेटे, पराग नार्वेकर, पं. स. सदस्य बाळा कांदळकर,हरकुळ सरपंच बंडू ठाकूर,रामगड सरपंच शुभम मठकर, उद्योजक अभिजित पाटील, रामू विखाळे, आशिष परब,राजू मानकर, सुशील चिंदरकर, गीतेश कडू, स्वप्नील शिंदे, राजू राठोड, उत्तम लोके, आदिनाथ दामले,राजू जांभेकर,अनंत पिळणकर,वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर,प्रा. मंदार सावंत, प्रा.रमन बाणे,डॉ. राजेश जगताप, अवधूत मालणकर,विलास गुडेकर, रुपेश आमडोसकर, भूषण परुळेकर,सचिन आचरेकर, सिद्धेश राणे,बबली राणे, गुरू पेडणेकर, इमाम नावलेकर, प्रतिक रासम, श्री. भाटकर, सुशांक घाडी,आबू मेस्त्री,धिरज मेस्त्री, रोहित राणे,जीवन माणगावकर,अजित काणेकर,संतोष पारकर, बी.जी. गावकर यांसह शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक, मित्रमंडळी ,हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.