बंडू हर्णे यांनी आपल्या पराभवाचं आत्मचिंतन करण्याची गरज : सत्यजित पारकर

Edited by: उमेश बुचडे
Published on: March 16, 2026 14:48 PM
views 70  views

कणकवली : शहरातील जनतेने बंडू हर्णे यांना नाकारले असताना हर्णे हे केवळ वायफळ बडबड करण्यातच अद्याप मश्गुल आहेत. स्वतःला काहीतरी समजते असे भासवण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या बंडू हर्णे यांनी आपल्या पराभवाचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे तसेच कणकवली शहरासाठी विकास निधी आणल्याच्या वल्गना सांगणाऱ्या हर्णे यांनी ते ज्यावेळी सत्तेत होते त्यावेळी उदय सामंत पालकमंत्री असताना दिलेला विकास निधी हा त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी दिला होता हे मान्य करतील का असा प्रश्न नगरसेवक सत्यजित पारकर यांनी केला आहे.

बंडू हर्णे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर बोलताना पारकर यांनी त्यांचा समाचार घेतला. नलावडे व हर्णे हे लोकांनी नाकारलेले लोक आहेत. समीर नलावडे यांच्या बाजूला बसण्या इतपर्यंत हर्णे यांची आता गरज राहिली आहे. नलावडे ना आधार देण्यासाठी धारकरी म्हणून हर्णे यांची ओळख आहे.  फक्त वायफळ बडबड करणे व आमच्यावर आरोप करणे एवढेच काम हर्णे यांना दिलेले आहे. बंडू हर्णे यांचा अभ्यास आता त्यांनी आपल्या बाजूला बसलेल्या नलावडे यांना सांगावा, कारण त्यांच्या अभ्यासाचा आता कणकवली शहराला उपयोग होणार नाही. कारण त्यांच्या अभ्यासामुळेच कणकवली शहराच्या नगर विकास आराखड्यात लोकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पण आम्ही जनतेच्या बाजूने राहणार असून हर्णे यांनी केलेले घोळ जनतेला पटवून देणार आहोत. हर्णे यांच्या खोट्या अफवा आता जनता ओळखू लागली आहे. कणकवली शहरवासीयांनी अशा खोट्या अफवांना बळी पडू नये असे आवाहन पारकर यांनी केले आहे.