मळगाव इथं १८ मार्चला ‘द केरला स्टोरी २’ चित्रपट

बलिदान मासानिमित्त शिवशंभू गृपच आयोजन
Edited by: विनायाक गांवस
Published on: March 16, 2026 15:18 PM
views 13  views

सावंतवाडी : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाचे औचित्य साधून श्री शिवशंभू ग्रुप, मळगावच्यावतीने शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या पटांगणावर बुधवार १८ मार्च रोजी रात्री ९ वाजता "द केरला स्टोरी-२" चित्रपट दाखविण्यात येणार आहे.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासाला १८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून हा बलिदान मास १८ मार्चंपर्यंत अखंडितरित्या सुरु राहणार आहे. या मासानिमित्त मळगाव येथे दररोज ध्यानमंत्र, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर संभाजी भिडे गुरुजींनी लिहिलेल्या प्रेरणादायी श्लोकांचे स्मरण, प्रेरणामंत्र तसेच वैचारिक जागृतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून बुधवार १८ मार्च रोजी द केरला स्टोरी-२ हा चित्रपट मळगाव येथे दाखविण्यात येणार आहे. या चित्रपटामधून ‘लव्ह जिहाद’ विषयक वास्तव घटनांवर आधारित कथा मांडण्यात आली आहे. त्यामुळे समाजात विशेषतः महिला व तरुण मुलींमध्ये जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने हा चित्रपट दाखविण्याचा निर्णय शिवशंभू ग्रुपच्यावतीने घेण्यात आला आहे. हा चित्रपट सर्व महिला वर्गाने तसेच तरुणींनी आवर्जून पहावा, असे आवाहन गृपच्यावतीने करण्यात आले आहे .