कणकवली ७९.७१ टक्के मतदान

प्रभाग २ मध्ये सर्वाधिक, प्रभाग ३ मध्ये सर्वात कमी
Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: December 03, 2025 14:04 PM
views 165  views

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत ७९.७१ टक्‍के एवढे जिल्ह्यात सर्वाधिक मतदान झाले. यात प्रभाग २ मध्ये सर्वाधिक ८५.२९ टक्‍के मतदान तर सर्वात कमी प्रभाग १४ मध्ये ७४.३६ टक्‍के मतदानाची टक्‍केवारी राहिली. कणकवली शहरात एकूण १३ हजार २७८ मतदारांपैकी १० हजार ५८४ मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला. यात ६४३३ पैकी ५२८६ पुरूष मतदारांनी तर ६८४५ पैकी ५२८६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.


शहरात प्रभाग तीन आणि नऊचा अपवाद वगळता दुरंगी लढती झाल्‍या. यापूर्वी कणकवली नगरपंचायतीची निवडणूक एप्रिल २०१८ मध्ये झाली होती. तर मे २०२३ मध्ये नगरपंचायतीचा कार्यकाळ संपला. त्‍यानंतर नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. आता २१ डिसेंबरला निकाल लागल्‍यानंतर पुन्हा एका कणकवली नगरपंचायतीवर लोकनियुक्‍त प्रतिनिधी असणार आहेत. 


प्रभागनिहाय झालेले मतदान आणि टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. प्रभाग १ मध्ये ८९८ पैकी ७६१ (८४.७४ टक्‍के), प्रभाग २- ७८२ पैकी ६६७ (८५.२९ टक्‍के),  प्रभाग ३ ः- ५८० पैकी ४६३ (७९.८३ टक्‍के), प्रभाग ४ ः-  ६७२ पैकी ५२४ ( ७७.९८ टक्‍के), प्रभाग ५ मध्ये ७९१ पैकी ६०० (७५.८५),  प्रभाग ६ ः- ७८३ पैकी ६५० ( ८३.०१ टक्‍के), प्रभाग ७ ः- ११२३ पैकी ९२४ ( ८२.२८ टक्‍के), प्रभाग ८ ः- ८२० पैकी ६९७ (८५ टक्‍के),  प्रभाग ९ ः- ८६२ पैकी ६८४ (७९.३५ टक्‍के),  प्रभाग १० ः- ७४८ पैकी ५७१ (७६.३४ टक्‍के), प्रभाग ११ ः- ६५८ पैकी ४९१  (७४.६२ टक्‍के), प्रभाग १२ ः- ९७५ पैकी ७९५  (८१.५४ टक्‍के), प्रभाग १३ ः- ७८० पैकी ५९९ (७६.७९ टक्‍के), प्रभाग १४ ः-७०६ पैकी ५२५ (७४.३६ टक्‍के), प्रभाग १५ ः- ५१४ पैकी ३८६ (७५.१० टक्‍के),  प्रभाग १६ ः- ८७२ पैकी ६९३ ( ७९.४७ टक्‍के), प्रभाग १७ ः- ७१४ पैकी ५५४ (७७.५९).