
कणकवली : तालुक्यातील तोंडवली येथे देवगड निपाणी राज्य मार्गाच्या सिमेंट कॉंक्रीट रस्ता कामासाठी तोंडवली बोभाटेवाडी येथे सुरू करण्यात आलेल्या क्रशर प्लांटमुळे परीसरातील घरांना तडे पडत असून धुळीचे साम्राज्य पसरले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनास व सबंधित ठेकेदार कंपनीस पत्रव्यवहार करून क्रशर बंद करण्यात यावा, या मागणीसाठी तोंडवली बोभाटेवाडी येथील ग्रामस्थांनी बुधवारी क्रशरच्या प्लांट समोर आमरण उपोषण सुरू केले. संबंधितांकडून मागण्यांबाबत अपेक्षित पूर्तता न झाल्याने उपोषण सायंकाळी उशीरानंतरही सुरूच होते.
या उपोषणात यशवंत सदडेकर, माजी उपसरपंच अशोक बोभाटे, ग्रा.पं.सदस्य रविंद्र बोभाटे, मनश्री कांडर, तात्या निकम, संतोष मिराशी, प्रकाश मेस्त्री, उध्दव बोभाटे, सीताराम मेस्त्री, अमित सदडेकर, विशाल मेस्त्री, मनोहर पटेल, प्रकाश बोभाटे, बाळा बोभाटे,महेंद्र सदडेकर,अभिजित बोभाटे, दिगंबर साळुंखे, मनीष बोभाटे, अनिल बोभाटे, सुनिल मोरये, मंगेश बोभाटे, समीर बोभाटे, प्रविण मोरये, तुकाराम मोरये, तेजस बोभाटे, अमोल मेस्त्री, चंद्रकांत बोभाटे, अंबरनाथ साळुंखे, सुनिल बोभाटे, सुभाष जुवेकर, अनिकेत पटेल, सुभाष बोभाटे, हरिश्चंद्र बोभाटे, कृष्णा बोभाटे, दिपक शिरसाट, मधुकर बोभाटे, संतोष मोरये, सचिन बोभाटे, अनिल कदम, संकेत मेस्त्री, हरिचंद बोभाटे, बबलू बोभाटे, सुजीत बोभाटे, अनिल पारकर, सदाशिव सुतार, सदाशिव मोरये, महादेव बोभाटे, सुप्रिया खडपे, दिनेश कांडर, संतोष गुरव, विघ्नेश बोभाटे, प्रणय साळुंखे, आयुष तळे, हर्ष मोरये, आर्यन मोरजकर, शुभम बोभाटे, हेमंत कांडर, दिपक कांडर, सुरेश यादव आदींचा समावेश होता.
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपोषणस्थळी भेट देत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, सरपंच मनाली गुरव यानी भेट देत माहिती घेतली. उपोषण स्थळी पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे,पोलिस पाटील विजय मोरये व होमगार्ड तैनात होते. कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅक्टर व आरोग्य कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र रात्री ग्रामस्थ आपल्या मागणीवर ठाम असल्याने उपोषण सुरूच होते.










