
देवगड : देवगड येथील सांविधानिक विचारमंच देवगडच्या वतीने देवगड तहसिलदार कार्यालयाच्या नजिकच्या पटांगणात रविवार दि.१४ एप्रिल रोजी छ शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने इतिहास संशोधक ,लेखक प्रा.मधुकर पाटील , कोल्हापूर यांचे सायंकाळी व्याख्यान होणार आहे. या जयंतीचे औचित्य साधून सायंकाळी देवगड कॉलेज नाका ते तहसिलदार कार्यालय नजीकच्या कार्यक्रम स्थळापर्यत भीम रॅली काढण्यात येणार आहे. रात्री 8.30 वाजता संगीतमय भीम गीतांचा नजराणा आरंभ नव्या युगाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी तहसिलदार संकेत यमगर, गटविकास अधिकारी वृषाली यादव, देवगड जामसंडे मुख्याधिकारी सूूूरज कांबळे, पोलीस निरिक्षक अरूण देवकर उपस्थित रहाणार असल्याची माहिती सचिव दिलीप कदम यांनी दिली आहे. तर देवगड जामसंडे शहरवासीय, तालुक्यातील सर्वसमाज बांधवांनी मोठया संख्येने जयंती कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन सांविधानिक विचारमंच देवगडचे अध्यक्ष के.एस. कदम यांनी केले आहे.