
सावंतवाडी : तालुक्यातील निगुडे ग्रामपंचायत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांच्या चुकीचं पध्दतीने संबंधित ठेकेदाराला रक्कम अदा न करता दुसऱ्या ठेकेदाराला रक्कम अदा केली या विरोधात आर्थिक गैरव्यवहार व अनियमितता संदर्भात आज निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी उपोषण केले होते. रात्रौ ०८:३० वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी याबाबत दखल घेऊन भ्रमणध्वनीवर सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांना उपोषणकर्ते गुरुदास गवंडे यांना लेखी पत्र द्या व पत्रात उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने फेर चौकशी करून त्याबाबतचा वस्तूनिष्ठ अहवाल आठ दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्याकडे सादर करा असे निर्देश दिले.
तसेच वरील प्रकरणी आपण सुरू केलेले उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे लेखी पत्र गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी दिले. यावेळी सहायक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, ग्रामविस्तार अधिकारी गजानन धर्णे, ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी विनायक पिंगुळकर यांच्या उपस्थित सदर उपोषण मागे घेण्यात आले आहे.
परंतु गुरुदास गवंडे यांनी लेखी दिले की, आठ दिवसात अहवाल आपणाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी, सिंधुदुर्ग यांना सादर न केल्यास याच ठिकाणी उपोषणाला पुन्हा बसावे लागेल याची नोंद घ्यावी. दरम्यान यावेळी उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष केतन सावंत, मनसेचे माजी उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर, न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर, सोनुर्ली उपसरपंच भरत गांवकर ,रोणापाल उपसरपंच योगेश केणी, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, माजी ग्रा. पं. सदस्य महेश सावंत, माडखोल माजी सरपंच संजय शिरसाट, तळकट माजी सरपंच रामचंद्र सावंत, संदीप गावडे, साईनाथ तुळसकर, राजन धुरी, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, सदाशिव कदम आदींनी भेट दिली.