कणकवलीत श्री चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन 6 मे पासून

विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
Edited by: उमेश बुचडे
Published on: April 23, 2026 21:54 PM
views 20  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ कणकवली तर्फे सालाबादप्रमाणे श्री  चौंडेश्वरी मंदिराचा २३ वा वर्धापन दिन व नवीन श्रीगणेश मंदिरात श्री गणेशमुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा 6,7,8 मे २०२६  रोजी आयोजित करण्यात आला आहे  तरी सर्व भाविकांनी व समाज बांधवांनी श्रद्धापूर्वक उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ कणकवली च्या वतीने करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे

बुधवार, दि. ०६ मे रोजी सायंकाळी ५ वा.

श्री गणेशमुर्ती, कळस व कलशासह सवाद्य मिरवणुक पटवर्धन चौक,बाजारपेठ

पटकीदवी मार्गे -प. पू. भालचंद्र महाराज मठ ते श्री चौंडेश्वरी मंदिर पर्यंत


गुरुवार, दि. ०७ मे रोजी सकाळी ८ वा. ते दुपारी १ वा. श्री गणेश मंदिराची वास्तुशांती व मुर्तीवरील धार्मिक विधी. रात्री 9 वा

मुलांचे शैक्षणिक बक्षिस वितरण सोहळा.

रात्रौ. १० वा सांस्कृतिक कार्यक्रम


शुक्रवार, दि. ०८ मे रोजी

सकाळी ८ वा. ते दुपारी १२ वा श्री गणेश मुर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण

सकाळी १० वा सत्यनारायणाची महापूजा

दुपारी १२ वा. ते १.०० आरती , दुपारी. १  ते ३ महाप्रसाद 


आयोजित केला असून या कार्यक्रमासाठी

सर्व भाविकांनी व समाज बांधवांनी श्रद्धापूर्वक उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांची शोभा वाढवावी  असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा कोष्टी समाज सेवा संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे