तालुकास्तरीय आरोग्य संपन्न गाव समितीची नियुक्ती

Edited by: विनायक गांवस
Published on: April 23, 2026 22:10 PM
views 21  views

सावंतवाडी : ''माझं गाव, आरोग्य संपन्न गाव'' अभियान अंतर्गत तालुकास्तरीय आरोग्य संपन्न गाव समितीची नियुक्ती करण्यात आली. पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदींच्या उपस्थितीत या समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.‌ रमेश कर्तसकर यांनी मार्गदर्शन केले. 

डॉ. कर्तसकर म्हणाले, माझं गाव, आरोग्य संपन्न गाव" यात आरोग्यदायी, जागरुक व सशक्त समुदाय निर्माण करणे, आरोग्य सेवेमध्ये सुधारणा करणे, आरोग्य हा विषय लोकांच्या दैनंदिन चर्चा व कृतीच्या केंद्रस्थानी आणणे, सामुदायिक स्तरावर आरोग्याशी संबंधित मुद्यांवर जागरुकता वाढविण्याच्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी अभियानाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी स्थापित केलेल्या तालुकास्तरीय आरोग्य संपन्न गाव समितीच्या अध्यक्षपदी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सह अध्यक्ष वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे, सदस्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद गहाणे, डॉ. मयूरेश पटवर्धन, डॉ. पूजा पाताडे, डॉ. विक्रम मस्के, डॉ. गजानन सारंग,  बाल विकास प्रकल अधिकारी छाया घाडीगांवकर, पाणी पुरवठा उप अभियंता सुरेश राणे, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, एनजीओ प्रतिनिधी रवी जाधव, गटशिक्षणाधिकारी सविता परब, पत्रकार प्रतिनिधी विनायक गांवस तर सचिवपदी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांची निवड करण्यात आली. सावंतवाडी जनरल जगन्नाथराव भोसले शाळा नं ३ सभागृह येथे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्तविक व आभार आरोग्य कर्मचारी शंकर परब यांनी मानले. याप्रसंगी पं.स.सदस्य जितेंद्र गावकर, प्रशांत सुकी, मायकल डिसोजा, उदय पारिपत्ये, शरद धाऊसकर, महेश धुरी, प्रथमेश सावंत, धनश्री मराठे, प्राजक्ता केळुसकर, अवनी राऊळ, प्रणाली टिळवे, नेहा कांबळी, उत्कर्षा गांवकर, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई आदींसह पंचायत समिती सदस्य, विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्यातून माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान मध्ये आपल्या ग्रामपंचायती येवोत बक्षीस पात्र होवोत हीच सदिच्छा व्यक्त करण्यात आली व कार्यशाळा प्रशिक्षण संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले