LIVE UPDATES

सावंतवाडीत 'अनबॉक्स ABX मोबाईल'चा थाटात शुभारंभ !

Edited by: विनायक गांवस
Published on: May 06, 2026 16:20 PM
views 1385  views

सावंतवाडी : शहरात 'अनबॉक्स ABX मोबाईल' या भव्य मोबाईल शोरूमचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामुळे एका नव्या आधुनिक दालनाची भर पडली आहे.  नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले.

या सोहळ्याला सावंतवाडीतील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी पाहायला मिळाली. 'अनबॉक्स ABX मोबाईल'च्या माध्यमातून सावंतवाडीकरांना आता नामांकित कंपन्यांचे मोबाईल फोन्स, गॅजेट्स आणि दर्जेदार ॲक्सेसरीज एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. आज नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते या दालनाचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, नगरसेवक तौकीर शेख, अनबॉक्स मोबाईलचे रियाज मलानी, रियाज बेग आदी उपस्थित होते.

सावंतवाडीच्या मुख्य बाजारपेठेत, हॉटेल चंदू भवन समोर सुरू झालेल्या या शोरूममध्ये उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती. सावंतवाडी आणि परिसरातील नागरिकांनी मोबाईल खरेदीसाठी आणि उत्कृष्ट सेवेसाठी 'अनबॉक्स ABX मोबाईल'ला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.