LIVE UPDATES

देवगड चिरेखाण संघटनेने घेतली तहसीलदार सूर्यकांत पाटील यांची भेट

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 03, 2026 16:11 PM
views 129  views

देवगड : देवगड चिरेखाण संघटना यांच्यावतीने देवगड तहसीलदार सूर्यकांत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे मिलींद साटम, बाबा कोकरे, काका जेठे, हिंदळेकर आदि उपस्थित होते.

देवगड तहसील कार्यालय येथे नव्याने देवगड येथील तहसीलदार पदाचा प्रभारी म्हणून कार्यभार तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी हाती घेतला असून पदावर रुजू झालेल्या तहसीलदार सूर्यकांत पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. देवगड तहसीलदार कार्यालयात पाटील यांचे काही दिवसांपूर्वी आगमन झाले आहे. त्यामुळे देवगड तालुका चिरेखाण संघटनेच्यावतीने त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.