दाणोलीत आज श्री साटम महाराज पुण्यतिथी उत्सव !

Edited by: ब्युरो
Published on: March 27, 2024 05:54 AM
views 83  views

सावंतवाडी : दाणोली येथील प्रसिद्ध श्री साटम महाराजांचा ८७ वा  पुण्यतिथी सोहळा बुधवार दि. २७ मार्च रोजी साजरा होत आहे. या पुण्यतिथी उत्सवानिमित्त साटम महाराजांच्या समाधी मंदिर आणि निवासस्थानी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साटम महाराजांच्या दर्शनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव परिसरातून भाविकांची अलोट गर्दी होते.

   या सोहऴ्यानिमित्त बुधवारी समाधी मंदिरात पहाटे ४.३० वाजता काकड आरती, सकाळी ५ वाजता अभ्यंगस्नान, सकाळी ७ वाजता झाराप येथील श्री बोभाटे बुवा यांचे कीर्तन, सकाळी ८ वाजता सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत खेमसावंत भोसले यांच्याहस्ते साटम महाराज समाधी पूजन व विधीवत पाद्यपूजा त्यानंतर श्री पाटकर, कोलगाव यांचे बासरी वादन, सकाळी ९ वाजता झाराप देथील बुवा संदेश सामंत यांचे भजन, सकाळी दहा वाजता पिंगुळी येथील ह. भ. प. वासुदेव सड़वेलकर यांचे कीर्तन, दुपारी १२ वाजता महाआरती, दुपारी १२.३० वाजता राधाकृष्ण संगीत साधनाच्या संचालिका  विणाताई दळवी आणि  सहकारी यांचा अभंग व भक्ती गीतांचा कार्यक्रम. दुपारी १ वाजल्यापासून अखंड महाप्रसादाला प्रारंभ, दुपारी दोन  वाजता कलंबिस्त येथील बुवा अंकुश सांगेलकर यांचे भजन, सायंकाळी ३ वाजता मुंबई येथील बुवा संदीप वाळके यांचे भजन, सायंकाळी ४ वाजता पुणे येथील ह.भ.प.नातूबुवा यांचे कीर्तन, सायकाळी ७ वाजता महाआरती, सायंकाळी ७.३० वाजता साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रात्री ८ वाजता सवाद्य पालखी मिरवणूकीला प्रारंभ होणार असून त्यानंतर मध्यरात्री १ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेदवणकर दशावतार मंडळ, चेंदवण यांचा  महिमा जगन्नाथ पुरीचा हा टिकसिनयुक्त दशावतार नाटक होणार आहे.

या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सावंतवाडी संस्थानचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंत भोसले आणि दाणोली बाजारपेठवासीयांनी केले आहे.