माडखोल इथं छत्रपती सैनिक भवनच उद्घाटन

Edited by: विनायक गांवस
Published on: January 12, 2026 17:06 PM
views 86  views

सावंतवाडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या भवनाची निर्मिती करण्यात आली आहे.सैनिक हे आपल्या देशाचे खरे नायक आहेत. त्यांच्या त्यागामुळेच आपण सुरक्षित आहोत. हे शिवछत्रपती सैनिक भवन केवळ एक इमारत नसून, सैनिकांप्रती असलेल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाला माडखोल परिसरातील नागरिक, माजी सैनिक आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. सैनिक हा देशाचा कणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्कारातून तयार झालेला आपला तरुण आज सीमेवर देशाचे रक्षण करत आहे. माडखोल येथे उभारण्यात आलेले हे सैनिक भवन केवळ एक इमारत नसून, ती सैनिकांच्या सन्मानाचे प्रतीक आहे. या भवनाच्या माध्यमातून समाजातील तरुणांना राष्ट्रसेवेची प्रेरणा मिळेल असा विश्वास श्री.‌परब यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधी, भाजपचे पदाधिकारी,जीजी राऊळ माडखोल उपसरपंच व सोसायटी चेअरमन, मसाजी राऊळ अध्यक्ष, जगन्नाथ परब उपाध्यक्ष,

उमेश कारिवडेकर सचिव, सहदेव राऊळ,मायकल,डिसोझामाजी जि. प सदस्य,पांडुरंग सावंत माजी सैनिक,स्वप्नील राऊळ यु.मो. आंबोली सरचिटणी,चंद्रकांत शिरसाट माजी सैनिक,लक्ष्मण गवळी माजी सैनिक,संजय राऊळ माजी सरपंच,संजय लाड माजी सरपंच,रवी राऊळ संतोष बिले,केतन आजगावकर सोशल मीडिया प्रमुख, दीपक गावकर, धिरेंद्र म्हापसेकर भा.ज.प चिटणीस आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'जय भवानी, जय शिवाजी'च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.