
सावंतवाडी : आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांच्या सामाजिक कार्याबद्दल महाराष्ट्रचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथे महाराष्ट्र मेडिकल लॅब टेक्नॉलॉजिस्ट संघटनेची १३ वी राज्य परिषद आयोजित करण्यात आली होती.
यावेळी आजगाव सरपंच यशश्री सौदागर यांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी बोलताना सौदागर यांनी सांगितले की, हा सत्कार म्हणजे आपल्या कामाची पोचपावती असून या पुढेही आपण सर्वांना एकत्र घेऊन गावाच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करू. आपल्या जो सन्मान केला त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सौदागर यांच्या झालेल्या सन्मानाबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांकडून शुभेच्छा दिल्या जात आहे.










