
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात वाळू (रेती) परवान्याचे नूतनीकरण रखडल्यामुळे डंपर मालक आणि वाळू व्यावसायिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ऑक्टोबर महिन्यापासून वाळू परवाना प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, परिणामी या व्यवसायाशी निगडित असलेले अनेक घटक — जसे की डंपर मालक, चालक, हार्डवेअर, लाकूड, गिरणी व्यावसायिक, बांधकाम व्यावसायिक, तसेच शासकीय ठेकेदार आणि बिल्डर व्यावसायिक — या सर्वांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, अशी तक्रार वाळू व्यावसायिक संघाने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे केली आहे. २५ डिसेंबर २०२५ पूर्वी परवाना प्रक्रिया पूर्ण न झाल्यास २८ डिसेंबर २०२५ नंतर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व डंपर मालक डंपर लावून उपोषण करण्याचा इशारा वाळू व्यावसायिक आणि डंपर मालकांनी दिला आहे.
चालू वर्षातील वाळू परवाना अद्याप झालेला नाही. प्रतिवर्षी ऑक्टोबर महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होते. परवाना न मिळाल्याने या व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. डंपर मालक व वाळू व्यावसायिकांनी ८/१०/२०२५ ते १४/१०/२०२५ या कालावधीत परवान्यासाठी अर्ज दाखल केले होते. ५८ वाळू परवानाधारकांनी सहभागी होऊन सर्व प्रक्रिया आपल्या विभागातून मंजूर करून घेतली. यामुळे सर्व परवानाधारकांनी कागदपत्रे आणि यंत्रसामुग्रीची जुळवाजुळव केली.
११ डिसेंबर २०२५ पर्यंत पुढील परवाना प्रक्रियेची कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे डंपर व वाळू व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची (परवाना न मिळाल्याने) वेळ आली आहे.
सदर विषय २५ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करावा आणि डंपर व वाळू व्यावसायिकांना दिलासा द्यावा. अन्यथा, २८ डिसेंबर २०२५ नंतर संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले जाईल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
वाळू व्यावसायिक समीर कृष्णा दळवी, नित्यानंद तुकाराम शिरसाठ, धीरज परब, अभिषेक गावडे, मिलिंद यशवंत परब, राजेश प्रसादी, राजन वाळके, मंदार महाजन, श्यामसुंदर धुरी, समीर वेर्लेकर, यशवंत हीर्लेकर, मंदार बांदेकर, प्रशांत सडवेलकर, स्वप्निल परब, स्वप्निल कुलकर्णी, स्वरूप सावंत, जयराम सरमळकर, उदय दळवी, शिवा कोळी, भालचंद्र पारकर, रफिक खान, मिथुन वजराटकर, गुरुनाथ मोहन चव्हाण, गुरुनाथ विश्वनाथ चव्हाण, सूर्यकांत चव्हाण, महादेव धुरी, अभिषेक राऊळ. सुभाष पायनाईक, महेश पेडणेकर, सुजय पुजारे, दीपेश माडीये, विजय सावंत, महेश नाईक, वैभव चव्हाण, सुधीर धुरी, सुभाष गावडे, गुरु गावडे, समीर धुरी, आरीफ शेख, समीर मर्तल, विकास गावडे, विजय चव्हाण, नियाब शहा, राजेश साळवेलकर, श्याम वाककर, संदेश वेतुरेकर, अक्षय बाईत, आकाश बिरमोळे, अभिषेक भोसले, अमृत नार्वेकर, देवेंद्र नाईक, अमित वाळके, राहुल भिसे, ऋषी अस्वलकर, साईश अरवारी, सोनू दळवी, गौरव तोंडवळकर, अक्षय मांजरेकर, काशिनाथ कोळी, शैलेश चव्हाण, महेश कदम, महेश शिरसाट, आशिष पिल्ले, संजय शिंदे, सचिन नाईक, सिद्धेश बोडेकर, सचिन मराठे, अंकुश गोळवणकर, कमलेश गोवेकर, सतीश गोवेकर, ओमकार गोलतकर, प्रशांत भिसके, प्रशांत परब, विकास तेंडोलकर, महेश राऊळ, सचिन दळवी, तानाजी माडये, प्रथमेश तेरसे, रघुनाथ करलकर, निखिल सारंग, संतोष चिलापी, आशिष यादव, अमित कांबळी, अंकुश केसरकर, संजय वराडकर, सरोज खान, प्रणय कांबळी, आबा पावसकर, हरीश गावकर, चैतन्य भोगवेकर, ओंकार वालावलकर, आदित्य वालावलकर, अक्षय म्हाडगूत, हर्षद गावडे, महेश म्हाडदळकर, जयेश दळवी, साई अनावकर, मिलिंद शेल्टे, वैभव देसाई, उल्हास नार्वेकर, प्रथमेश धुरी, महेश शिरसाट, ललित खोत, नाना खोत, तन्मय वर्दम, गौरव ठाकूर यांच्यासह इतर व्यावसायिकांनी आपल्या स्वाक्षऱ्या करून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी सिंधुदुर्ग मच्छिंद्र सुकटे यांच्याकडे तातडीने कार्यवाहीची मागणी केली आहे.











