कोनाळ खंडेराय भवानी माता वर्धापनदीन सोहळा उद्या पासून

Edited by:
Published on: May 06, 2024 13:07 PM
views 72  views

दोडामार्ग : कोनाळ येथील श्री देवी खंडेराय भवानी माता १३ वा वर्धापन दीन सोहळा ७ व ८ मे रोजी विविध कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. यानिमित्त ७ मे रोजी रात्रौ १० वा. नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर यांचा पौराणिक "पंचतत्व महिमा" हा नाट्यप्रयोग होणार आहे. तर ८ मे रोजी सकाळी ८ वा. देवीचा अभिषेक, लघुरुद्र, १० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.३० वा. आरती, १ वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. सुश्राव्य भजन, रात्रौ ८ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, तर रात्रौ १० वाजता खानोलकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ खानोली वेंगुर्ला यांचा पौराणिक "मातृवात्सल्य" हा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी व नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.