सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठा असा समजला जाणारा सण गणेशोत्सव शनिवारपासून सुरू होत असून, यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाकरमाणी यायला सुरुवात झाली आहे. तर बाजारपेठाही फुलून गेल्या आहेत. जिल्ह्यात या गणेशोत्सवात एकूण ७२ हजार ७८९ घरगुती तर ३२ ठिकाणी सार्वजनिक गणपती विराजमान होणार आहेत.
जिल्ह्यातील गणेशोत्सव कालावधीत
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये किंवा वाहतुकीची कोंडी कुठेही होऊ नये. यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी येत असल्याने जादा रेल्वे,एसटी,खाजगी बस मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात चाकरमानी यायला सुद्धा सुरुवात झाली आहे .यावर्षी खाजगी घरगुती गणपती ७२ हजार ७८९ विराजमान होणार आहेत तर सार्वजनिक गणपती ३२ विराजमान होणार आहेत. अशी माहिती पोलीस खात्याच्या अहवालातून उपलब्ध झाली आहे.