सावंतवाडी : इस्लाम धर्मात ईद मिलाद-उन-नबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद निमीत्त सावंतवाडी शहरात रॅलीच आयोजन मुस्लिम बांधवांकडून करण्यात आले होते. यानिमित्ताने शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मशिदमध्ये उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
शहरात ईद ए मिलाद निमीत्त रॅली काढण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून घर, मशिदींमध्ये कुराण वाचले गेले. या दिवशी गरिबांना दानही केले जाते. सावंतवाडी हा सण मुस्लिम बांधवांकडून साजरा करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मशिदमध्ये उपस्थित राहत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते.