
कुडाळ : ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी यांच्यामार्फत जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा गोठोस नं. १ येथे मोफत संगणक प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरास ग्लोबल फाउंडेशनचे व्यवस्थापक प्रसाद परब, प्रशिक्षक स्वप्निल नाईक, मुख्याध्यापक तावडे तसेच कर्मचारी उपस्थित होते.
उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुरुनाथ सावंत, सरपंच सूरज कदम, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातवीची विद्यार्थिनी समिक्षा भितये हिने केले. ९ तारीखपासून या प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ झाला असून १९ तारीखपर्यंत हे प्रशिक्षण चालणार आहे. मुख्याध्यापकांनी ग्लोबल फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना प्रसाद परब म्हणाले, सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक मुलांना शालेय स्तरापासूनच संगणकाची ओळख निर्माण होणे आवश्यक आहे. आता सगळे डिजिटल झाल्यामुळे त्याचप्रमाणे एआय तंत्रज्ञानामुळे संगणक शिक्षण अनिवार्य झाल्याचे ते म्हणाले. या प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक संजय घाडी यांनी केले. सोबत शाळेचे उपशिक्षक राठोड तसेच जाधव सर उपस्थित होते.











