
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी कुटुंबीयांसमवेत मतदान केले. यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
यावेळी राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले व राजकन्या उर्वशी भोंसले आदी उपस्थित होते.










