
वेंगुर्ले : तुळस गावात गेल्या महिनाभरापासून तलाठी उपस्थित नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, शेतकरी तसेच ग्रामस्थांना विविध शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दाखले, महसुली कागदपत्रे, शेतीसंबंधित कामे व इतर शासकीय सेवांमध्ये विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर तुळस जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ यांनी तहसीलदार श्री. ओंकार ओतारी यांना निवेदन देऊन तुळस गावासाठी लवकरात लवकर तलाठी उपस्थित करण्याची मागणी केली. नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी संतोष शेटकर उपस्थित होते. नागरिकांच्या सोयीसाठी तुळस गावात नियमित तलाठी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.










