
वेंगुर्ला : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि महाराष्ट्र राज्यातील प्रभावी चेहरा असलेले विशालजी परब यांनी नुकताच वेंगुर्ला नगरपालिकेच्या क्षेत्रात 'झंझावात' दौरा करून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला आहे. त्यांचे हे दौरे केवळ औपचारिक नव्हते, तर प्रत्येक बुथवर जाऊन त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला, ज्यामुळे त्यांना अभूतपूर्व आणि उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांनी बुथ स्तरावरील संघटनात्मक रचना, आगामी निवडणुकांची तयारी, आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या स्थानिक समस्या यावर सखोल चर्चा केली.परब यांच्या या थेट संवादामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. त्यांनी मांडलेल्या समस्यांवर तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने, कार्यकर्त्यांनी भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची तयारी दर्शवली.
विशाल परब यांच्या या दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे की, भाजपच्या युवा नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा आणि सामान्य नागरिकांचा दृढ विश्वास आहे. त्यांचे हे दौरे केवळ निवडणुकीच्या तयारीचा भाग नसून, पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. वेंगुर्ला नगरपालिकेतील कार्यकर्त्यांचा हा उस्फूर्त प्रतिसाद पाहता, आगामी काळात विशालजी परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपची ताकद या भागात निश्चितच वाढणार, हे स्पष्ट होते.










