शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा

Edited by: दिपेश परब
Published on: December 07, 2025 14:30 PM
views 304  views

वेंगुर्ले : वैयक्तिक कारणास्तव पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने आपण आपल्या तालुकाप्रमुखपदाचा राजीनामा देत आहे असे जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांना लिहिलेले पत्र शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी रविवारी वेंगुर्ले शिवसेनेच्या मासिक सभेत उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे सुपूर्द केले.

आपण यापुढेही शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. आपल्याला तालुका प्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आमदार दीपक केसरकर यांचे सहकार्य लाभले आहे. या सर्वांचा आपण आयुष्यभर ऋणी राहीन असे त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.