देवगड : देवगड येथील कुणकेश्वर समुद्रात श्रावणातील पहिल्याच सोमवारी कुणकेश्वर येथील समुद्रात पोलिस बंदोबस्त असताना मंगळवारी सायंकाळी 6 वा.सुमारास कुणकेश्वर समुद्रात पोलिस यंत्रणेला 10 नॉटीकल मैल अंतरावर एक महाकाय जहाज दिसले. यामुळे सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली. तात्काळ पोलिस व कस्टम विभागाने कोस्टगार्डची मदत घेवून जहाजा विषयी माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिस व कस्टम विभागाने या जहाजाबाबत माहिती घेतल्यानंतर हे जहाज मालवाहतुक जहाज असल्याचे व संशयास्पद काहीही नसल्याचे समजतात सुरक्षा यंत्रणे सुटकेचा निश्वास सोडला.
हे जहाज अर्धा ते पाऊण तासानंतर मुंबईच्या दिशेने गेले. यावेळी ते जहाज मालवाहतुक जहाज असून मुंबई नावाशिवा येथे जात असल्याचे व जहाजावर संशयास्पद काहीही नसल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला प्राप्त झाली .