
सिंधुदुर्गनगरी : १३ नोव्हेंबर २०२५ रोजी संपलेल्या नामनिर्देशन अर्ज सादरीकरणाच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यातील चार नगरपरिषदांसाठी सभासद पदासाठी एकूण ७ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेत सर्वाधिक ४, मालवण नगरपरिषदेत ३, तर वेंगुर्ले आणि कुडाळ नगरपरिषदेत कोणतेही अर्ज दाखल झालेले नाहीत. सादर झालेल्या सर्व ७ अर्जांची नोंद ऑनलाईन पद्धतीने झाली असून, ऑफलाईन स्वरूपात एकही अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, अध्यक्ष पदासाठी केवळ एकच नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहे. हे अर्ज सावंतवाडी नगरपरिषदेतून ऑनलाईन सादर करण्यात आले असून, उर्वरित तीन नगरपरिषदांत अध्यक्ष पदासाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदांमधील सभासद व अध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र सादरीकरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.










