
सावंतवाडी : येथील प्रतिथयश शिक्षण संस्था, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी या विद्यालयाने मार्च २०२६ च्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयातून एकूण ८९ विद्यार्थी व परीक्षेस बसले होते आणि सर्वच्या सर्व ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम कु. मृणाली मधुकर देसाई ९७.८०%, द्वितीय कु. तेजस चंद्रोजी सावंत ९७.२०%, तृतीय कु. आर्या भार्गव फाले ९६.४०% हीने प्राप्त केला. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालक वर्गातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.










